19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी आधारकार्ड बॅक खात्याशी संलग्न करण्याचे आवाहन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला केंद्र सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ जून 2023 मध्ये जमा होणार आहे. केंद्र सरकारने या 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचा लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न (जोडणे) व ई-केवासी प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले असून या दोन्ही बाबी लाभार्थ्यांनी परिपूर्ण केल्याशिवाय त्यानां पुढील हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.

 

या पार्श्वभूमीवर लाभार्थी शेतकऱ्यांनी तातडीने आपला आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबाला वर्षातून तीन वेळा या योजनेचा प्रत्येकी दोन हजार रुपये हप्त्याप्रमाणे वर्षातून सहा हजार रुपये देण्यात येतात. आगामी 14 व्या हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करण्याचे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी पोस्ट ऑफिस कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा केंद्रावर आधार हे बँक खात्याला संलग्न करून घ्यावे. यासाठी आधारकार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्राच्या आधारे पोस्टात कर्मचाऱ्यांमार्फत इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडावे. बँक खाते 48 तासांत आपल्या आधार क्रमांकाशी जोडले जाईल. ही पद्धत अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने सुलभ आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वरील प्रमाणे तात्काळ e-kyc करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,बीड एस.एम.साळवे यांनी केले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles