17.9 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार महागाई भत्ता

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ही सेवा आहे. तिजोरीची चावी अर्थमंत्र्यांकडे आहे. मात्र मी बोललो की ते नाही म्हणत नाहीत. आज एसटी महामंडळाचा वर्धापन दिन आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.

प्रवासी हे एसटीसाठी सर्वस्व असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, एसटीचा चेहरामोहरा बदलण्याचे काम शासन करीत आहे. नवीन इलेक्ट्रिक बसेस, वातानुकूलित बसेस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात येत आहे.  महामंडळाच्या ताफ्यात लवकरच ७ हजार बसेस येणार आहेत.

तसेच बस स्थानकांवर जमिन उपलब्धतेनुसार मराठी चित्रपटांसाठी मिनी थिएटर ही नवीन संकल्पना राबविण्यात येईल. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. एसटी बसेस, बस स्थानक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले.

महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीला ओळखले जाते. मी जुनी एसटी पाहिली, तीही चांगली आहे. जून ते सोन अस म्हटले जाते. एसटीची सेवा सुधारत चालली आहे. नेहमी अधिकाऱ्यांना सांगत असतो गाडीचा पत्रा निघाला असेल तर त्याला दुरुस्त करत जावा. जेणेकरून अपघात होणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना देखील टोला लगावला. मोफत प्रवास आणि महिलांना आरक्षण दिल्यामुळे विरोधी पक्षाला जरा भीती वाटत आहे, असे शिंदे म्हणाले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles