18.9 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

अंधश्रद्धेच्या बळी पडलेल्या शिक्षिकेला भामट्यानी लुटलं!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

राज्यात आजही अनेक ठिकाणी भोंदूबाबांवर अगदी सहज विश्वास ठेवला जातो. यामुळे मोठं नुकसान होतं, याबाबत गावागावात आवाहन करुनही बऱ्यावेळा लोकांना ते पटत नाही आणि अनर्थ घडतात.असाच एक धक्कादायक प्रकार बीडमधून समोर आला आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुशिक्षित असूनही अंधश्रद्धेच्या बळी पडलेल्या शिक्षिकेला एका भामट्याने लुटलं आणि तिच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी महिलेनं महिलेनं पोलिसात न्याय मागण्यासाठी धाव घेतली आहे.

 

घरातील वाईट शक्ती बाहेर काढण्यासाठी सुवर्ण कलश पुजा करायला लावत दोन भामट्यांनी कलशातील तब्बल १४ तोळे सोने लांबवल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी शिक्षीकेच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. घरामध्ये वाईट शक्ती आहे, त्यामुळेच दुखणे मागे लागले आहे असं या महिलेच्या मनावर बिंबवण्यात आलं.

त्यामुळे ती वाईट शक्ती बाहेर काढण्यासाठी घरात सुवर्ण कलश पूजा करावी लागेल असे सांगत या भामट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सर्व सोन्याचे दागिने एका कलशमध्ये ठेवण्यास सांगितले. त्यानंतर घरातील सर्वांना बाहेर पाठवून दिले आणि सोने असलेल्या कलशच्या ऐवजी दुसराच एक कलश त्याठिकाणी ठेवला. त्यानंतर हा कलश त्या कुटुंबियांच्या हाती देत १२ ते १३ वर्ष हा कलश उघडू नका अन्यथा अनर्थ होईल असेही सांगितले.

कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी कलश उघडून पाहिले असता त्यामध्ये सोन्याचे दागिन्याऐवजी कोळसा आढळून आला. त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. अखेर पीडित संजीवनी हनुमंतराव मेडकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र लोटके, मिना लोटके या दोघांविरुध्द कलम ४२०, ४०६, ४९८ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles