18.9 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

सर्व्हेतील पसंतीचे श्रेय एकट्या माझं नाहीतर.”, एकनाथ शिंदेंकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

‘सर्वेतील पसंतीचे श्रेय एकट्या एकनाथ शिंदे यांचे नाही. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्रिमंडळ, जनता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे’, असा उल्लेख करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वेवरून राज्यातील सत्ताधारी गटात सुरू झालेल्या धुसफुसीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न कोल्हापूर येथे बोलताना केला.

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमात हा उल्लेख करतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, ‘राज्य शासन केंद्राकडे या योजना पाठवत असते. त्यातील प्रत्येक प्रस्तावाला मान्यता दिली जाते. प्रस्तावातील एकाही पैशाची कपात केली जात नाही. डबल इंजिनचे हे सरकार गतिमान प्रगती करीत आहे. मागील सरकारला सरकारमध्ये ब्रेक, स्पीड ब्रेकर होते. ते दोन्हीही आम्ही हटवले आहेत.’

विदेशी गुंतवणुकीच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यासही मुख्यमंत्री शिंदे विसरले नाहीत. ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर होता. नंतर हा क्रम कर्नाटक, गुजरात या राज्यांकडे गेला. गेल्या ११ महिन्यात महाराष्ट्र पुन्हा प्रथम क्रमांकावर आला आहे. याचा सार्थ अभिमान आहे. दावोस येथे झालेल्या जागतिक उद्योग परिषदेमध्ये महाराष्ट्र शासनाशी १ कोटी ३७ लाख रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर, विकासाकडे जात आहे हेच यातून दिसत आहे,’ असा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारवर मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार टीका केली. ‘आधीच्या सरकारने सिंचनासाठी काहीच काम केले नाही. आमच्या सरकारने २९ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली असल्याने ६० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्धार केला आहे. मागील सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यांची अंमलबजावणी आमच्या सरकारने केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत. यामुळेच ‘शासन आपल्या दारी’ सारख्या कार्यक्रमाला लोक मोठ्या संख्येने येत आहेत. हे सरकारच्या कामाचे यश आहे,’ असा उल्लेख शिंदे यांनी केला.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles