19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

डी.एल.एड प्रवेशासाठी उद्यापासून अर्ज नोंदणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पुणे |

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (विद्या प्राधिकरण) डी.एल.एड अभ्यासक्रमाची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.त्यानुसार १३ ते २७ जून या कालावधीत अर्ज भरता येणार असून, पहिली अंतिम गुणवत्ता यादी ५ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी डी.एल.एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाइन अर्ज भरण्याच्या सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली आणि अध्यापक विद्यालयांची यादी विद्या प्राधिकरणाच्या https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार १३ ते २७ जून या कालावधीत अर्ज भरणे, १३ जून ते २८ जून या कालावधीत अर्ज ऑनलाइन पडताळणी करण्यात येईल.

 

तात्पुरती गुणवत्ता यादी ३ जुलैला प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर ५ जुलैला पहिली अंतिम गुणवत्ता जाहीर केल्यानंतर ७ ते १० जुलैदरम्यान पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया होईल. त्यानंतर आणखी दोन फेऱ्या राबवल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी शाखेतील पात्र विद्यार्थ्यांना बारावीत खुल्या संवर्गासाठी किमान ४९.५ टक्के गुण, तर अन्य संवर्गासाठी ४४.५ टक्के गुण आवश्यक आहेत. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवांरानी ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज भरणे बंधनकारक आहे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles