16.8 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजार रूपये दंड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अंबाजोगाई |

येथील अप्पर सत्र न्यायाधीश श्रीमती एस. जे. घरत, जिल्हा न्यायाधीश- २. अंबाजोगाई यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या विशेष पोस्को प्रकरण के. २३/२०१८, महाराष्ट्र शासन वि. प्रकरणातील आरोपीने स्वतची अल्पवयीन पुतणी वय ५ वर्षे ही खेळत असताना घरात नेवून बळजबरीने बलात्कार केला. सदर प्रकरणातील आरोपीस मा. न्यायालयाने कलम ३७६ (A) (B) भा.द.वी. नुसार विस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

 

 

या प्रकरणातील आरोपी हा परळी तालुक्यातील आहे. त्याने स्वत:ची अल्पवयीन पुतणी वय ५ वर्षे ही घरात खेळत असताना घरात कोणीही नसल्याच्या फायदा घेवून तिचे कपडे काढून तिचेवर बळजबरीने शारीरिक संबंध केले, घरी सांगीतले तर जिवे मारण्याची धमकी दिली कगैरे फिर्याद पिडीत मुलीच्या आईने परळी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर ( दि. ०१) सप्टेंबर २०१८ रोजी पो.स्टेशन परळी शहर येथे गु.र.नं. १४७ / २०१८, कलम ३७६ (A), ३७६ (B) भा. द.वी सहकलम ५ (n), ६ बा.ले.अ.प्र.का. अन्वये गुन्हा नोंद करून सदर प्रकरणाचा तपास सहा. पो. निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी करून दोषारोप पत्र मा. न्यायालयात सादर करण्यात आले होते.

 

सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले व मा. न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस वीस वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि दहा हजार रूपये दंड ठोठावला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. शिवाजी व्यंकटराव मुंडे यांनी काम पाहिले व त्यांना माजी सरकारी वकील श्री. अशोक वि. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. सदर प्रकरणात पोलीस पैरवी म्हणून पो. हे. कॉ. गोविंद कदम, पो.हे.कॉ. बाबुराव सोडगीर व श्रीमती पो.हे.कॉ. गंदा तांदळे यांनी काम पाहीले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles