20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासोबत संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची हकालपट्टी; बीडमध्ये झालेल्या राड्यानंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेमध्ये खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची जाहीर सभा बीडमध्ये होणार आहे. या सभेआधीच ठाकरे गटातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. गुरुवारी शहरातील महाप्रबोधन सभेच्या स्थळाची पाहणी करण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे बीडमध्ये आल्या होत्या. यावेळी सुषमा अंधारे आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यामध्ये वाद झाला. आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले, आप्पासाहेब जाधव यांनी केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? सुषमा अंधारे या पैसे घेऊन पद विकत असल्याचा गंभीर आरोप अप्पासाहेब जाधव यांनी केला होता.

 

तसेच सुषमा अंधारे यांना दोन चापटा लगावल्याचा दावाही जाधव यांनी केला होता. मात्र दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मारहाणीच्या बातमीत तथ्य नसल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे. तसेच जाधव हे शिंदे गटाला जावून मिळाले असून, ते शिंदे गटाच्या स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला होता.

दरम्यान आता या वादाची गंभीर दखल ठाकरे गटाकडून घेण्यात आली आहे. महाप्रबोधन यात्रेच्या पूर्वसंध्येलाच शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुख या दोघांची हाकालपट्टी करण्यात आली आहे. तशी घोषणा ‘सामना’मधून करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासोबत बीड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं सामनामध्ये म्हटलं आहे. दरम्यान या वादामुळे आता ठाकरे गटाची महाप्रबोधन सभा चांगलीच चर्चेत आली आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles