14.4 C
New York
Wednesday, October 15, 2025

Buy now

spot_img

अंगप्रदर्शन आणि उत्तेजक कपडे धारण केलेल्या व्यक्तीस तुळजाभवानी मंदिरात ‘नो एंट्री’

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

तुळजापूर |

तुळजाभवानी देवीच्या मंदिराचे पावित्र्य जपण्याच्या अनुषंगाने तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने अधिकृतपणे अंगप्रदर्शन आणि उत्तेजक कपडे घालण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबतचे फलक मंदिर परिसरात लावले गेले आहेत.

तुळजाभवानी मंदिराचे पावित्र्य जपण्याच्या अनुषंगाने तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून यापूर्वी हा निर्णय झालेला आहे. यापूर्वीच्या तहसीलदारांनी याविषयी कामकाज केलेले असून दि. १८ मे रोजी या संदर्भातील भाविकांना माहिती देणारे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. यामध्ये मंदिराचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यानिमित्ताने प्रशासन अधिकारी तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.

प्रशासन कार्यालय महाद्वार आणि मंदिर परिसरात मुख्य दर्शनी जागेवर अंग प्रदर्शक, असभ्य व अशोभनीय तसेच हाफ पॅन्ट, बर्मुडा धारण केलेल्या व्यक्तीस मंदिरात प्रवेश नाही अशा आशयाचे हे फलक लावले आहेत. या निर्णयाची फलक तुळजापूर तुळजाभवानी मंदिर परिसरात लावल्यानंतर या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले आहे.

तुळजापूर तीर्थक्षेत्रामध्ये यासंदर्भात यापूर्वी फारशी चर्चा नव्हती परंतु, मंदिर संस्थांनी हा घेतलेला निर्णय चांगला आणि स्वागतार्ह असल्याचे पुजारी वर्गांमधून सांगण्यात आले. या निमित्ताने पुजारी बांधवांनी तहसीलदार सौदागर तांदळे यांचा सत्कार केला. याप्रसंगी धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांची उपस्थिती होती.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles