20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

कर्नाटकात भाजपाचा पराभव, मोदी लाट ओसरली.? ‘भाजपाच्या पराभवाची पाच कारणे ?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बंगळुरु |

कर्नाटकात 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान  झाले. एकूण 73.19 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास अंतिम टप्पात आहे. त्यामुळं बहुचर्चित कर्नाटक निवडणुकीचा निकाल काही क्षणात पूर्ण होईल. येथे भाजपाची व काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली. त्यामुळं संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागले आहे. आतापर्यत काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळं काँग्रेस येथे विजयी होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळं निकालाआधीच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यंतीत कोण-कोण असणार आहे, याची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे जय-पराभवाची कारणमीमांसा केली जात आहे, यश-अपयशाची कारणे शोधली जात आहेत. जाणून घेऊन भाजपाच्या पराभवाची पाच कारणे.

 

1 भ्रष्टाचार

 

मागील सरकारच्या काळात अर्थांत २०१८ पासून येथे कर्नाटकचे सरकार आहे. येथे भाजपाच्या काळात दोन मुख्यमंत्री झाले. जेडीएससोबत सुरुवातीला भाजपाने सरकार स्थापन केले. त्यावेळी येडुरप्पा मुख्यमंत्री झाले. ते पायउतार झाल्यानंतर बसवराज बोम्मई हे मुख्यमंत्री झाले. बसवराज सरकारच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला. मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी मोठे घोटाळे व भ्रष्टाचारे केले. याला लोकं कंटाळली होती, लहान मुले देखील ‘कमिशन.कमिशन’ असे बोलते होती. त्यामुळं भ्रष्टाचार, कमिशन यामुळं लोकांचं मतपरिवर्तन झाल्याने, याचा फटका भाजपाला बसला.

 

2 उद्योगपती गौतम अदानी प्रकरण

 

दुसरं म्हणजे जेव्हा देशात उद्योगपती गौतम अदानी यांचे हिंडनबर्ग प्रकरण गाजले. याचे पडसाद कर्नाटकात सुद्धा पाहयला मिळाले. अदानींचा मुद्दा प्रचारात देखील विरोधकांनी उचलून धरला. त्यामुळं हे सरकार फक्त धन दांडग्यांचे आहे, गोरगरिबांचे नाही, अशी मनधारण लोकांची झाली. आणि याचे नुकसान भाजपाला झाले.

 

3 राहुल गांधींचे खासदार सदस्यत्व रद्द

 

दरम्यान, राहुल गांधींनी २०१९ साली कर्नाटकात बोलताना मोदींवर टिका केली होती, यावेळी त्यांनी मोदी नावाचे सगळे चोर कसे. असं वक्तव्य केल्यामुळं गुजरातमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर राहुल गांधींचे खासदरकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा मुद्दा देखील प्रचारात आणला गेला होता. त्यामुळं हा मुद्धा विरोधकांनी उचलून धरला. आणि याची चीड लोकांनी मतपेटीतून दाखवली

 

4 हिंदुत्त्वाची मुद्दा

 

ही निवडणूक काँग्रेस व भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. त्यामुळं भाजपा व काँग्रेसमधील देश पातळीवरील नेते देखील प्रचारात सहभागी झाले होते. मोदींनी १९ सभा व रोड शो केले. यावेळी प्रचारात त्यांनी प्रत्येक सभेची सुरुवात बजरंग बली की जय.अशी सुरुवात केली. तसेच भाजपाने हिंदुत्वाच्या मुद्दावर मतांची मागणी केली. हे लोकांना पटलेले दिसले नाही. या निवडणुकीच्या प्रचारात हिंदुत्वाचा मुद्दा चांगलाच गाजला.

 

5 मोदी लाट ओसरली?

 

दरम्यान, १०१४ पासून देशात मोदी लाट आली आहे, ही मोदी लाट देशातील विविध राज्यात निवडणुकीत पाहयला मिळाली. मात्र यावेळी कर्नाटका मोदी लाटेचे जादू चालली नाही. मोदींनी मोठमोठी घोषणा केली. याला लोकं बळी पडल्याचे दिसले नाही. त्यामुळं मोदी-शहा तसेच भाजपाने देशपातळीवरील दिग्गज नेत्यांची यंत्रणा कर्नाटकात कामाला लावली होती, पण याचा काही परिणाम दिसला नाही, उलट मोदी लाट ओसरल्याचे चित्र आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles