20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

दरमहिना ३०,००० पगार घेणाऱ्या महिला इंजिनिअरच्या घरी धाड; सापडला कुबेराचा खजिना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

भोपाळ, |

मध्य प्रदेशमध्ये एका इंजिनीअरच्या घरावर सरकारी अधिकाऱ्यांकडून छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत अधिकाऱ्यांना सापडलेल्या वस्तू पाहून तेही चक्रावले आहेत.

 

गुरुवारी भोपाळमध्ये सरकारी नोकरीत इंजिनीअर पदावर कार्यरत हेमा मीणाच्या घरी छापेमारी करण्यात आली. यात ती कोट्यवधींची मालकीण असल्याचं समोर आलंय. छापेमारीत सापडलेली मालमत्ता पाहून हिशेब लावणाराही गोंधळून जाईल. हेमाविरुद्ध बेहिशेबी मालमत्तेची तक्रार दाखल झाल्याने लोकायुक्तांच्या आदेशावरून पोलिसांनी ही छापेमारी केली.

 

महत्त्वाचं म्हणजे तिचा पगार अवघा 30 हजार रुपये आहे. भोपाळचे डीएसपी संजय शुक्ला यांनी सांगितलं की, मध्य प्रदेश पोलीस हाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये कार्यरत सहाय्यक इंजिनीअर हेमा मीणाच्या घरावर सकाळी 6 वाजल्यापासून छापेमारी करण्यात आली. छापेमारीत घरात देशी-परदेशी जातीची 150 हून अधिक कुत्री आढळली आहेत. त्यांना ठेवण्यासाठी 50 हून अधिक खोल्या बनवण्यात आल्या होत्या.

 

कुत्र्यांसाठी पोळ्या बनवण्यासाठी 2.50 लाख रुपयांचे मशीनही सापडली आहेत. तसंच घरात कुत्र्यांसाठी घेतलेलं 1.50 लाख रुपयांचं तूपही सापडलं. भोपाळमधील बिलखिरिया येथील घर आणि फार्म हाऊससह अनेक घरांची कागदपत्रंही अधिकाऱ्यांना सापडली आहेत. 30 हजार पगार मिळवणारी हेमा मीणा लक्झरी आयुष्य जगत असल्याचं समोर आलंय.

 

छापेमारी करणाऱ्या पथकाला तिच्या घरात 30 लाख रुपयांचा टीव्ही सापडला आहे. लक्झरी लाइफ जगणाऱ्या हेमा मीणाच्या घरी 20 आलिशान कार आणि महागड्या दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. ती स्वत: आयपीएस असल्याचं सांगून लोकांना फसवायची. तिच्या बंगल्यात डझनहून अधिक कर्मचारी असून, ती त्यांच्याशी वॉकी-टॉकीने बोलायची.

 

बंगल्यात जॅमरही लावण्यात आला आहे. 2011 मध्ये सरकारी नोकरीला लागलेल्या हेमा मीणाचा पगार फक्त 30 हजार रुपये आहे. अवघ्या 12 वर्षांत तिने आपल्या उत्पन्नाच्या 200 पट जास्त संपत्ती मिळवली. घटस्फोटीत हेमाकडे सुमारे 10 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

 

तिने वडिलांच्या नावावर भोपाळमधील बिलखिरिया येथे 20 हजार स्क्वेअर फूट जमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीवर तिने एक कोटी रुपये खर्च करून आलिशान बंगला बांधला आहे. तिने भोपाळ, रायसेन व विदिशामध्ये जमिनी खरेदी केल्याची कागदपत्रं सापडली आहेत. या शिवाय हार्व्हेस्टर, भात पेरणी यंत्र, ट्रॅक्टर आणि शेतीसाठी वापरण्यात येणारी यंत्रं खरेदीची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. तिच्या बंगल्यात सरकारी बांधकामासाठी वापरलेलं सिमेंट, गोदरेज, टेबल आणि खुर्चीही सापडली आहे. 2020 मध्ये मीणाविरोधात बेहिशोबी मालमत्ता असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. हेमाबरोबर या घोटाळ्यात अनेक अधिकाऱ्यांची नावंही समोर येऊ शकतात, असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles