18.3 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

पी.एम.किसान योजनेच्या लाभापासून लाभार्थी वंचित राहू नये यासाठी आवशक बाबींची पूर्तता करा – निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

पी.एम.किसान योजनेचा मे महिन्यात वितरीत होणाऱ्या 14 व्या हप्त्यापासून लाभार्थी वंचित राहू नये यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्याचे आवाहन निवासी उप जिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे अद्यावत करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या आधारे संबंधित तहसील कार्यालयात संपर्क साधावा. पी.एम.किसान पोर्टलवरील फार्मर्स कॉर्नर मधील ई-के.वाय.सी. -ओटीपी आधारित सुविधेद्वारे ई- केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे किंवा केंद्र शासनाच्या ॲपद्वारे फेस डिटेक्शन करून घ्यावे. तसेच बँकेत जाऊन बँक खात्यास आधार संलग्न करून घ्यावे अथवा पोस्टमास्तर यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडण्यात यावे. लाभार्थ्यांने पी.एम.किसान पोर्टलवर बेनिफिशरी स्टेटस मधून तपासणी करून वरील बाबींची पूर्तता झाली असल्याची खात्री करून घ्यावी, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles