19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

मुंडे बहिण-भाऊ पुन्हा आमनेसामने; वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक जाहीर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

जवाहर संस्था आणि बाजार समित्यांच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे.या निवडणुकीत पुन्हा एकदा मुंडे बहीण-भावामध्ये लढत होणार आहे.यामुळे यावेळी बीडची जनता कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

21 संचालक पदासाठी कारखान्याची ही निवडणूक होत आहे.10 मे ते 16 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.17 मे ला अर्जाची छाननी होईल. 18 मे ते 1 जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 2 जून रोजी चिन्ह वाटप होईल, तर 11 जूनला मतदान प्रक्रिया पार पडेल आणि 12 जून रोजी मतमोजणी होईल.

गेल्या काही वर्षांपासून कारखान्यावर पंकजा मुंडे यांचे वर्चस्व आहे. पण यावेळी कारखान्यावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंडे बहीण भावातील संघर्ष पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत मुंडे बहिण भाऊ वेगवेगळे पॅनल उभे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता वैद्यनाथ कारखान्यावर नेमकी कोणाची सत्ता येणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles