-3 C
New York
Friday, February 6, 2026

Buy now

spot_img

बदल्यांना स्थगिती असलेल्या शिक्षकांना मूळ शाळेवरच ठेवा; ग्रामविकास उपसचिवांचा आदेश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पुणे |

राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमधील ज्या शिक्षकांच्या बदल्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे, अशा शिक्षकांना सध्या तरी त्यांच्या मूळ शाळेवरून त्यांना मुक्त (रिलिव्ह) करू नका, सध्या त्यांना त्यांच्या मूळ शाळांवरच राहू द्या, असा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागातील उपसचिव पो.द. देशमुख यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे.

राज्य सरकारच्या या आदेशामुळे उच्च न्यायालयाने बदल्यांना अंतरिम स्थगिती दिलेल्या शिक्षकांना किमान उच्च न्यायालयातील प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत त्यांच्या मुळ शाळेवर राहता येणार आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या सहाव्या फेरीतील बदल्यांना काही शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यामुळे उच्च न्यायालयाने सहाव्या फेरीतील बदल्यांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. या आदेशानुसार या याचिकांवर येत्या ७ जून रोजी सुनावणी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने एका पत्राद्वारे गुरुवारी (ता.४) हा आदेश दिला आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles