20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १४ वा हप्ता येत्या जून महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा केला जाणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १४ वा हप्ता येत्या जून महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा केला जाणार आहे. मात्र या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांचे बॅंक खाते हे आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य आहे.बॅँक खात्याला आधार क्रमांक जोडलेला नसल्यास, हे पैसे जमा होणार नसल्याचे राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले.

त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित आपापले बॅंक खात्याला आधार क्रमांक जोडून घ्यावा. आधार क्रमांक बॅँक खात्याशी जोडण्यासाठी आता आपापल्या गावातील टपाल कार्यालयात सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता आपापल्या गावातच बॅंक खात्याला आधार क्रमांक जोडता येणार असल्याचेही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दर चार महिन्यांतून एकदा प्रत्येकी २ हजार रुपये हप्त्याप्रमाणे वर्षाला ६ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. केंद्र सरकारने साडेचार वर्षांपूर्वी ही योजना सुरु केली आहे. त्यानुसार आतापर्यंत १३ हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.

येत्या मेच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात १४ व्या हप्त्याचे प्रत्येकी दोन हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. राज्याच्या कृषी विभागाने पात्र शेतकऱ्यांना आपापले बॅँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडता यावे, यासाठी पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील प्रलंबित लाभार्थींची गावनिहाय यादी टपाल कार्यालयांना उपलब्ध करून दिली आहे.

गावपातळीवर १५ मेपर्यंत मुदत

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अनुदानासाठी पात्र असलेले परंतु अद्यापही आपापल्या बॅँक खात्याशी आधार क्रमांक न जोडलेल्या शेतकऱ्यांना आपापल्या गावातच आधार क्रमांक जोडण्यासाठी खास मोहीम सुरु करण्यात आली आहे. ही मोहीम येत्या १५ मेपर्यंत चालू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी १५ मेपर्यंत गाव पातळीवर आधार क्रमांक जोडता येणार आहे.

शेतकऱ्यांनी काय करावे

– आपापल्या गावात टपाल विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडावे

– यासाठी आधार कार्ड आणि स्वतःचा मोबाईल क्रमांक टपाल कार्यालयात जावे

– टपाल कार्यालयातील कर्मचारी हे आपले बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी जोडतील

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles