20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने बीडमध्ये विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने बीडमध्ये विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या  केली आहे. बीड शहरातील आदर्श गणेश नगरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या तरुणाने 30 एप्रिल रोजी झालेल्या एमपीएससीची परीक्षा दिली होती. मात्र पेपर अवघड गेल्याने तो चिंतेत होता. त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षय अप्पा पवार असं आत्महत्या करणाऱ्या या विद्यार्थ्यांचं नाव आहे. दरम्यान याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

याबाबत पोलीसंक्दुना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बीड शहरातील आदर्श गणेश नगरमध्ये एमपीएससीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षय अप्पा पवार असं या विद्यार्थ्यांचं नाव असून, तो मूळचा माजलगाव तालुक्यातील राजेवाडी गावचा रहिवासी आहे. अक्षय हा गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एमपीएससीची तयारी करत होता. दरम्यान 30 एप्रिल रोजी झालेल्या एमपीएससीची परीक्षा देण्याससाठी तो बीडमध्ये आला होता.

तर परीक्षा दिल्यावर त्याला पेपर अवघड गेला होता. त्यामुळे तो चिंतेत होता. तसेच रविवारी परीक्षा दिल्यानंतर तो बीड शहरातील आदर्श गणेश नगरमध्ये त्याच्या मित्राच्या खोलीवर मुक्कामासाठी थांबला होता. पण एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने त्याने मित्राच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर याबाबत मयत अक्षयच्या कुटुंबातील सदस्यांना पोलिसांनी फोनवरून माहिती दिली आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles