13.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

“.इतके राजकीय भूकंप झाले तर मला महाराष्ट्राची काळजी वाटते”; पकंजा मुंडे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मात्र अजूनही राज्यात राजकीय भूकंप सत्तापालट यासारख्या चर्चा काही केल्या कमी होताना दिसत नाहीत.

काही दिवसांपासून अजित पवार भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच आता पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा राजकीय भूकंपांविषयी चिंता व्यक्त केली आहे. इतके राजकीय भूकंप झाले तर मला महाराष्ट्राची काळजी वाटत आहे असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यांच्या या वाक्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

राज्यातील एकूण परिस्थितीविषयी बोलताना, “मला इतके राजकीय भूकंप झाले तर मला टेन्शन येतं. माझा महाराष्ट्र कसा राहिल? याचं मला टेन्शन येतं. महाराष्ट्राचं राजकारण कसं असेल याचंही टेन्शन येतं. मला या सगळ्याचे काही संकेत असण्याचा काही भाग नाही. कारण राज्यातले नेते याबाबत निर्णय घेतील. भाजपाला अतिरिक्त नेत्यांची गरज आहे का? लोकांची गरज आहे का? या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मी नाही” असे पंकजा मुंडेंनी म्हटले आहे.

“माझ्या पंधरा वर्षांच्या राजकारणात मी कधीही कुणावर व्यक्तिगत पातळीवर टीका केलेली नाही. भूकंप विरहित पक्ष बांधणीची गरज आहे. मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे हे आमच्या हातात नाही. २०२४ च्या निवडणुकीत ते जनता ठरवणार आहे. लोकांचा विश्वास जिंकून भाजपाने निवडणुका जिंकल्या आहेत. यापुढेही तसंच होईल. ” असाही विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केला.

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीत माझी लढाई आहे. दोघेही मल्ल मोठ्या शक्तीचे आहेत. मात्र प्रवृत्ती वेगळी आहे”, अशा शब्दांत पंकजा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात सातत्याने वाद रंगलेला बघायला मिळतो आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles