3.7 C
New York
Tuesday, December 23, 2025

Buy now

spot_img

आष्टी तालुक्यात वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू; एक बैलजोडही दगावली

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आष्टी |

आष्टी तालुक्यातील केरुळ आणि सावंगी आष्टी येथे वीज कोसळून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. काजल विकास माळी (२३, रा.केरुळ ) आणि राणी (ताई) संदीपान सावंत (३५, रा.सांगवी आष्टी) असे मृत महिलांचे नाव आहे.

यासोबतच पारगाव जो. येथे देखील वीज कोसळून युवराज नवनाथ भोराडे यांची बैलजोडी मृतुमुखी पडली.

आष्टी तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस झाला. दरम्यान, सायंकाळी सहा वाजेदरम्यान केरुळ येथे शेळ्या चारत असलेल्या काजल विकास माळी यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत सांगवी आष्टी येथील राणी (ताई) संदीपान सावंत या माहेरी हिंगणी येथील शेतात काम करताना अंगावर वीज कोसळून मृत्यूमुखी पडल्या. यासोबतच पारगाव जो. येथील युवराज नवनाथ भोराडे यांची बैलजोडी देखील जागीच मृत झाली आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles