13.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

‘भाजपात जाण्यासाठी कुटुंबियांवर दबाव, सिल्व्हर ओकवरील बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य,’ राऊतांचा गौप्यस्फोट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नागपूर |

विरोधीपक्ष नेते अजित पवार भाजपसोबत जाणार अशी चर्चा सध्या राज्यातील राजकरणात रंगली आहे. अशातच शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

संजय राऊत म्हणाले आहेत की, ”भाजपात जाण्यासाठी कुटुंबियांवर दबाव असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.”

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे की, ”मी आणि उद्धव ठाकरे हे गेल्या आठवड्यात शरद पवार याना भेटलो. आमची प्रदीर्घ चर्चा झाली. ही चर्चा महाविकास आघाडीच्या संदर्भात, राज्यातील राजकारण यावर झाली. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव वापरून विरोधी पक्षाचे आमदार फोडायचे, यावरही चर्चा झाली.”

संजय राऊत म्हणाले की, ”शिवसेनाबाबतही त्यांनी तेच तंत्र वापरलं आणि आमदार फोडले. यातच आदित्य ठाकरे यांनी देखील सांगितलं, कसे प्रमुख नेते ईडीच्या भीतीने रडत होते. तेच तंत्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या बाबतीत वापरलं जात आहे. हा दबाव कोणत्या प्रकारचा आहे, यावर चर्चा झाली.”

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles