13.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

बीडमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लोटला जनसागर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्धरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे!

बीड | प्रतिनिधी

भारतीय संविधान निर्माते बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  132 वी जयंती भारतासह अनेक देशात साजरी झाली. त्या अनुषंगाने बीडमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी  जनसागर लोटला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माने कोटी कुळांचा उद्धार झाला असून माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार मिळाले. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  संबंध परिघात रेकॉर्ड ब्रेक साजरी केली जाते.
    बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती आणि उपस्थित जनसमुदाय यांच्याकडून त्रिशरण,पंचशील गृहण करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भन्ते धम्मशिल, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे , युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे, तहसीलदार सुहास हजारे, आ.संदिप क्षीरसागर, अड.सर्जेराव तांदळे, अजय सवाई, सुशीलाताई मोराळे, रवी दळवी, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.राजेंद्र जगताप, संदिप उपरे, अशोक हिंगे,राजू जोगदंड, किसन तांगडे, अरुण सवाई, बबन वडमारे, भगवान कांडेकर, प्रा.बाळासाहेब गव्हाणे, अविनाश जोगदंड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अरुणाताई आठवले, प्रा.प्रदिप रोडे, अशोक ठोकळ, संतोष गायकवाड, दयानंद सरपते, सूर्यकांत जोगदंड, पांडुरंग सुतार, प्रा.संजय कांबळे, प्रकाश वक्ते, शैलजाताई ओव्हाळ, संगीताताई वाघमारे, लक्ष्मीताई सरपते, मायाताई मिसळे, तानाजी शिनगारे, सुमेध जोगदंड, अशोक गायकवाड,  भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाचे पदाधिकारी यांच्यासह, आंबेडकरी जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
अशी निघाली मिरवणूक!
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सायंकाळी 6 वाजता शहरातील विविध ठिकाणच्या मिरवणूक एकत्रित आल्या. भारतीय बौद्ध महासभेच्या रथामागे सर्व मिरवणुका निघाल्या होत्या. त्यानंतर बशीरगंज, मळीवेश मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी मिरवणूका आल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन मिरवणुकांची सांगता झाली.
भीमज्योत रॅलीने वेधले लक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 13 एप्रिल रोजी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाते. त्यानंतर भीमज्योत रॅली काढली जाते. या रॅलीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आंबेडकर समुदायाचा सहभाग असतो. या भीमज्योत रॅलीने शहर नागरिकांचे लक्ष वेधले होते.
शहर नटले रोषणाईने
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बीड शहर रोषणाईने नटले होते. बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाची ईमारत आणि जिल्हा परिषद ईमारत आदी ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शहरातील विविध ठिकाणच्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून आपापल्या भागामध्ये निळे झेंडे, विद्युत रोषणाई, पताके, आदी सजावट करून शहराच्या सौंदर्यात भर टाकली होती.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles