-9.2 C
New York
Tuesday, January 27, 2026

Buy now

spot_img

राष्ट्रवादीच्या बड्या आमदाराकडून स्वतःच्या वडिलांना धक्काबुक्की; अदखलपात्र गुन्हा दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर व त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांचे वडिल रवींद्र क्षीरसागर यांनी केला. याबाबत त्यांनी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अदखलपात्र (एनसी) गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

मंगळवारी (ता. १२) साडे दहा वाजता शहरातील त्यांच्या नगर रोडवरील निवासस्थानी हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. तुमच्या बहिणींना घरी का येऊ दिले, या कारणाने संदीप क्षीरसागर व अर्जुन क्षीरसागर यांनी आपली कॉलर पकडून धक्काबुक्की केली व माझ्यासह बहिणींना घराबाहेर हाकलून दिल्याचे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

यावरुन संदीप क्षीरसागर व त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर या दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गुरले करत आहेत.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles