19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

मराठवाडा महसूल विभागातील 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मराठवाडा विभागातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करणारे आदेश शासनाने काढले आहेत.विभागातील एकूण 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना 13 एप्रिलपर्यंत बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पदग्रहण अवधी समाप्त होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्यास कारवाईच इशारा देखील देण्यात आला आहे.

पाहा कोणाची कुठे बदली…

अ.क्र. अधिकाऱ्याचे नाव कार्यरत ठिकाण बदलीनंतरचे ठिकाण
1 जनार्दन विधाते उप विभागीय अधिकारी. कन्नड, छत्रपती संभाजीनगर निवासी उप जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर
2 संगीता चव्हाण-तावदरे उप जिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) छत्रपती संभाजीनगर उप जिल्हा निवडणूक अधिकारी, नांदेड
3 शेषराव सावरगांवकर सहायक आयुक्त (महसूल) छत्रपती संभाजीनगर संचालक, मराठवाडा प्रशिक्षण प्रबोधनी, छत्रपती संभाजीनगर
4 सुधीर चक्कर-पाटील उप विभागीय अधिकारी गंगाखेड, परभणी उप विभागीय अधिकारी, अहमदनगर
5 माणिक आहेर उप विभागीय अधिकारी वैजापूर, छत्रपती संभाजीनगर उप विभागीय अधिकारी, (शिर्डी, अहमदनगर)
6 शर्मिला भोसले उप जिल्हाधिकारी (सामन्य प्रशासन) जालना उप जिल्हाधिकारी (राहप्र भूसंपादन) नाशिक
7 नामदेव टिळेकर उप विभागीय अधिकारी, बीड उप विभागीय अधिकारी, माळशिरस जि..सोलापूर
8 अंजली कानडे-पवार जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जालना सहायक आयुक्त (मावक) कोकण भवन
9 मच्छिंद्र सुकटे जिल्हा पुनर्वसन अधिकारी, (लपा) बीड निवासी उप जिल्हाधिकारी ,सिंधुदुर्ग
10 जीवन भगवान देसाई विशेष भूसंपादन अधिकारी (पूर्णा प्रकल्प) लातूर उप जिल्हाधिकारी (सामन्य प्रशासन) रायगड
11 चंद्रकांत सूर्यवंशी निवासी उप जिल्हाधिकारी, हिंगोली निवासी उप जिल्हाधिकारी

आदेशात देण्यात आलेल्या सूचना…

  • सदरील आदेश तात्काळ अंमलात येत असून उपरोक्त नमूद अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना दर्शवण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी ते धारण करत असलेल्या पदावरुन या आदेशान्वये एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यांनी त्यांच्या पदस्थापनेच्या पदावर 13 एप्रिल 2023 ला रुजू होणे अनिवार्य आहे.
  • संबंधित अधिकारी नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकाला हजर झाले याबाबत ई-मेलद्वारे, टपालाद्वारे शासनाला त्वरीत कळवावे.
  • संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयंतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम 1989 च्या नियम 15 अन्वये विहित केलेल्या उक्त तरतूदीनुसार. पदग्रहण अवधी समाप्त होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध शासन निर्णयानुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी 13 एप्रिलला रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा या पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा अकार्यदिन” (dies non) म्हणून गणला जाईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करु नये. तसेच, मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचं रजेचे अर्ज स्वीकारु नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.
  • आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रूजू न झाल्यास, कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles