नवी दिल्ली |
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.
निवडणूक आयोगाचा हा पक्षाला मोठा धक्का आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे हा पक्ष केवळ प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे. किमान चार राज्यांमध्ये पक्षाचे अस्तित्व असणे गरजेचे आहे. या सगळ्या नियमांमधून राष्ट्रवादी अपात्र ठरला आहे. केवळ राष्ट्रवादी पक्षच नाही तर आणखी काही पक्षांवर देखील ही कारवाई केली आहे.
10 जानेवारी २००० ला राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. २०१४ पर्यंत दर्जा कायम होता. परंतु त्यानंतर पक्षाला आयोगाने नोटिसा पाठवल्या.
इतर राज्यांमधले अस्तित्व कमी झाल्याने निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. इतर राज्यातला प्रादेशिक पक्षांचा दर्जा कमी झाला आहे. निवडणूक आयोगाने काढलेली ऑर्डर १८ पानांची आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत १६ टक्के मतं मिळाली होती. २८८ पैकी ५४ जागा जिंकल्या होत्या. या सगळ्या बाबींचा निवडणूक आयोगाने विचार करुन त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी याबाबतची घोषणा केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रस पक्ष आता प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी यासंबधी प्रतिक्रिया दिली आहे. जो निर्णय आला आहे त्याच्याविषयी अधिकृत माहिती आलेली नाही. आम्ही ज्येष्ठ विधिज्ञांकडून सल्ला घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं