21.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी महाविकास आघाडीची वज्रमुठ!

- Advertisement -
बीड |
महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती देशात नावलौकिक मिळत असून चाळीस वर्ष सत्ता भोगून प्रस्थापितांनी बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे बारा वाजले असून यंदाच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचे वज्रमुठ प्रस्थापितांना आसमान दाखवून मतदारसंघातले शेतकरी बांधव परिवर्तन घडविणार माझी घडविणारच असा विश्वास शेतकरीमहाविकास आघाडीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक अनुषंगाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषद मान्यवरांनी असा विश्वास व्यक्त केला.
गेल्या 40 वर्षापासून प्रस्थापितांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माध्यमातून शेतकऱ्यांची प्रचंड पिळवणूक केली असून एकीकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती देशभरात नावलौकिक मिळविता असुन बीडच्या कृषी उत्पन्न समितीचे बारा वाजूणयाचे काम 40 वर्षापासून प्रस्थापित करीत आहेत. हमाल आणि व्यापारी मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर आपल्या कुटुंबातील लोकांचे नाव सामील करून घेतले असून व्यापाऱ्यांमध्ये जाण्याच्या व्यापाऱ्यांचे नाव यादीमध्ये आले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत अशा प्रकारचे सोयीचे राजकारण प्रस्थापितांनी केले असून आम्ही कुणावर टीका करता नाहीत‌. पण गेल्या 40 वर्षापासून बीड कृषी उत्पन्न बाजार समिती प्रस्थापितांनी शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल किंमत दिली असून यामुळे अनेक शेतकरी बांधवांचे संसार उध्वस्त झाले आहेत.पण यंदाच्या निवडणुकीत शेतकरी आणि शेतकर्याचे पोर ही निवडणूक लढवीत आहेत शेतकरी महाविकास आघाडीने परिवर्तन करण्याची वज्रमूठ मोठ बांधली असून गेल्या 40 वर्षात जे घडले नाही ते या निवडणुकीत घडणार असून कृषी उत्पन्न बाजार समिती प्रस्थापितांची सत्ता उधळून लावून शेतकऱ्यांचे पोर या ठिकाणी बसणार आहे. या परिवर्तनाच्या लढाईत मतदारांनी प्रस्थापितांच्या भूलथापांना व दबावाला बळी न पडता बळीराजाचे राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीवर आणावे असे आव्हान या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदारांना केले आहे.
या परिवर्तनाच्या लढाईत शेतकरी महाविकास आघाडीचे आमदार संदीप क्षीरसागर माजी आमदार सय्यद सलीम उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख राजेश्वर चव्हाण, ज्येष्ठ नेत्या प्राध्यापक सुशीलाताई मोराळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र दळवी, वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे, शेकापचे बाळासाहेब घुमरे, महादेव धांडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश बजगुडे, शेतकऱ्यांचे युवा नेते धनंजय गुंदेकर, गणेश मस्के उद्धव खाडे यांच्यासह संभाजी ब्रिगेड, सावता परिषद, विविध आघाड्या महिला आघाड्या, युवती आघाड्या, युवक आघाड्या, विद्यार्थी आघाडी आदी संघटना एक ताकतीने ही निवडणूक लढविणार आहेत आणि बीड कृषी उत्पन्न बाजार समितीत परिवर्तन घडविणार म्हणजे घडविणारच याबाबत कोणाचे दुमत नसावे असे आव्हान शेतकरी महा विकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत केले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles