3.6 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img

केवळ नातं बिघडलं म्हणून जोडीदारावर बलात्काराचा आरोप लावू शकत नाही – मुंबई उच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

जेव्हा दोन प्रौढ व्यक्तींमध्ये नातेसंबंध असतील आणि काही काळानंतर ते संबंध बिघडले किंवा लग्नापर्यंत पोहोचले नाही, तेव्हा ती व्यक्ती जोडीदारावर बलात्काराचा आरोप लावू शकत नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी 29 मार्च रोजी हा निकाल दिला होता, जो या आठवड्यात उपलब्ध झाला आहे. वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये 2016 मध्ये एका महिलेने एका पुरुषावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

महिलेने केला होता बलात्काराचा आरोप

 26 वर्षीय महिलेने आपल्या तक्रारीत दावा केला होता की, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून या व्यक्तीला भेटली होती आणि त्याने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्या व्यक्तीने आपण निर्दोष असल्याचा दावा करत खटल्यातून मुक्त होण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायाधीशांनी त्याची याचिका मंजूर करताना नमूद केले की, तो व्यकी आणि ती महिला आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांमध्ये नाते प्रस्थापित झाले तेव्हा ते भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या प्रौढ होते. ते दोघे अशा वयात होते जिथे त्यांच्या कृत्याचे परिणाम समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी परिपक्वता होती.

उच्च न्यायालयाची टिप्पणी

 उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, महिलेच्या म्हणण्यानुसार, काही प्रसंगी त्यांचे संबंध सहमतीचे होते, तर काही वेळा ते जबरदस्तीचे होते. हे संबंध बऱ्याच काळापर्यंत चालू होते. मात्र असे असूनही हे संबंध केवळ लग्नाच्या आश्वासनावरच प्रस्थापित झाले, असा निष्कर्ष निघत नाही. न्यायमूर्ती डांगरे यांनी आपल्या निकालात पुढे नमूद केले आहे की, केवळ नातेसंबंधात दुरावा आला म्हणून प्रत्येक प्रसंगी शारीरिक संबंध महिलेच्या इच्छेविरोधात होते, असे म्हणता येणार नाही. तिच्या स्वत:च्या म्हणण्यानुसार, तिने केवळ लग्नाच्या आश्वासनामुळेच नव्हे तर त्या व्यक्तीचे तिच्यावर प्रेम असल्यामुळेही शारीरिक संबंधांना संमती दिली होती.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles