13.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

परळीत जुगार अड्ड्यावर छापा; २९ जुगाऱ्यासह १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

परळी |

परळी शहरातील हमाल वाडी परिसरात माजी नगरसेवक जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती माजलगाव चे सहायक पोलीस अधीक्षक डॉ धीरजकुमार यांना मिळाली. त्यांनी बुधवारी रात्री ९ वाजता आपल्या पथकासह छापा मारला. यात तब्बल २९ जुगारी पकडले असून त्यांच्याकडून १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यात सध्या अवैध धंद्याविरोधत मोहीम हाती घेतली आहे. मागील आठवड्यात बीडमध्ये एका जुगार अड्यवर छापा टाकून याच पथकाने एका माजी नगरसेवकच्या क्लब चा पर्दाफाश केला होता. त्यांनतर आता परळीत त्यांनी मोर्चा वळवला. परळी शहरातील हमाल वाडी भागात माजी नगरसेवक जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती धीरजकुमार यांना मिळाली होती. त्यांनी लगेच सापळा लावला. रात्री उशिरा त्यांनी छापा मारून ही कारवाई केली. यामधे २९ लोकांना ताब्यात घेऊन परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दुचाकी, चारचाकी, मोबाईल, रोख रक्कम असा १७ लाख ९३ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यावेळी या ठिकाणी आरोपी बाळासाहेब महादेव बळवंत(रा.हमालवाडी, ता.परळी), ज्ञानोबा उर्फ बापू अनंतराव नागरगोजे (वय ६३ वर्ष रा. शिवाजीनगर, परळी) दिलीप रामराव गडम (लातूरकर) (वय ६० वर्ष रा.विजय विश्वराज सिटी, लातूर), विठ्ठल गणपतराव भुसेवाड(वय ६६ वर्ष उत्तर त्रिमूर्तीनगर,परभणी), नासेर शेरखान पठाण (वय ५५ वर्षे रा. मलीकपूरा,परळी),  सय्यद अमेर सय्यद जाफर (वय ४४ वर्षे रा.पोट मोहल्ला, परळी),  बाळू सर्जेराव आल्हाट  ( वय २८ वर्षे रा. मोगरा ता. माजलगाव जि. बीड), नामदेव तुकाराम कराड (वय 53 वर्ष रा.इंजेगाव,परळी),  देवराव लक्ष्मण शिंदे (वय ५० वर्षे रा.लोणी, परळी) पांडुरंग राघोबा काळे (वय ३८ वर्षे रा.सिरसाळा,परळी) चेतन त्रिंबक महाजन (वय २० वर्षे रा. महाजन गल्ली सोनपेठ, ता.जि.परभणी), व्यंकटी युवराज राजळे (वय 35 वर्ष राहणार बोर्डा ता.गंगाखेड जि.परभणी), रतन रघुराम हजारे (वय ४७ वर्ष रा. डीघोळ ता.सोनपेठ जि.परभणी),  सुभाष गोपीनाथ जाधव (वय ४० वर्षेवर्ष रा. डीघोळ ता.सोनपेठ जि.परभणी), बापूराव रामभाऊ वगरे ( वय ३८ वर्ष रा. शिंदेवाडी ता. माजलगाव),  बळीराम हरिभाऊ चव्हाण(वय ४३ वर्षे वर्ष रा. डीघोळ ता.सोनपेठ जि.परभणी), शेख बशीर शेख फरीद (वय ५८ बियाणी महामंडळ संजयनगर, परभणी), अनिल गंगाधर कंदे(वय ३७ वर्षे रा.कोपरा ता.अहमदपूर जि. लातूर), शाम रामभाऊ माने (वय ४९ रा.हमालवाडी ता.परळी), वैजीनाथ विश्वभर सुर्यवंशी (वय ४५ वर्षे रा. कोपरा ता. अहमदपूर जि. लातूर), बालाजी सखाराम जाधव (४३ वर्षे रा.वडर कॉलनी,परळी), मुसाखान शेरखान पठाण (वय३९ वर्षे रा.कोमटवाडी ता.जि. परभणी), मासुम हमीद पठाण (वय ४० वर्षे रा.पोखर्णी ता.जि. परभणी), खलील अजेशखान पठाण ( वय ३४ रा.पोखर्णी ता.जि. परभणी), रवींद्र सुधार कदम (वय २६ वर्षे फकीर जवळा ता.धारूर), भारत किसन गायकवाड ( वय५० वर्षे ता.संगम),  केशव विश्वभर बलवंत (वय ८३ वर्षे रा. हमालवाडी), रमेश केशव वाघ( वय ५९ वर्षे रा.पोखर्णी ता.जि. परभणी), अशोक चंद्रभान बडे (वय ३२ वर्षे रा.खाडेवादी ता. माजलगाव) या जुगाऱ्यांकडून यावेळी एकूण १७ लाख ९३ हजार २७० रु.जप्त करण्यात आली असून परळी शहर ठाण्यात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम ४,५ झाला असून पुढील तपास सपोनि.गोसावी करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक डॉ धीरजकुमार, सहायक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड, पोलीस कर्मचारी अशोक नामदास, गणेश नवले, संतराम थापडे, युवराज चव्हाण, तुकाराम कानतोडे आदींनी केली.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles