24.1 C
New York
Saturday, July 19, 2025

Buy now

spot_img

महसूल अधिकाऱ्यांचे ३ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनंतर आता महसूल अधिकाऱ्यांनीही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. येत्या ३ एप्रिलपासून महसूल विभागाचे अधिकारी बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहे.

या राज्यव्यापी आंदोलनात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदारही सहभागी होणार आहेत. सन १९९८ पासूनचा नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांवरील अन्याय दूर करावा, त्यांना राजपत्रित अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी लागू करावी, या मुख्य मागणीकरिता हे बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. यापूर्वी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने मागील ३ मार्च रोजी सरकारला इशारा पत्र दिले होते. त्यानंतर १३ मार्च २०२३ रोजी राज्यभरात सामूहिक रजा व विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र याचीही दखल घेण्यात न आल्याने कामबंद आंदोलन अटळ ठरल्याचे संघटनेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

या कामबंद आंदोलनात राज्यातील पाच हजारांवर महसूल अधिकारी सहभागी होतील, असे सांगितले जात आहे. यामध्ये ८०० उपजिल्हाधिकारी, १५०० तहसीलदार आणि ४ हजार नायब तहसीलदार यांचा समावेश आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles