राजापूर |
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज मंगळवारी न्यायालयाने फेटाळून लावला. 6 फेब्रुवारी रोजी अपघात घडवत पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या केल्याच्या आरोप पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर आहे.
रिफायनरी प्रकल्पाविरोधात लिखाण करणारे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या दुचाकीला पंढरीनाथ आंबेरकरने त्याच्या चारचाकी गाडीने धडक देत हत्या केली. राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीशे हत्या प्रकरणात पंढरीनाथ आंबेरकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पंढरीनाथ आंबेरकरने 1 मार्च 2023 रोजी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणी न्यायालयाकडून दोन ते तीन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने जामिन अर्जावरील सुनावणीसाठी 20 मार्चची तारीख दिली. त्यावेळीही दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाने सुनावणीसाठी 28 मार्च ही पुढील तारीख दिली होती. मंगळवारी सरकारी पक्षातर्फे ऍड. अनिरुध्द फणसेकर यांनी जोरदार युक्तिवाद केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी पंढरीनाथ आंबेरकरचा जामिन अर्ज फेटाळून लावला.