-10.2 C
New York
Sunday, January 25, 2026

Buy now

spot_img

जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या आत्महत्येप्रकरणी प्रदीप फाटे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

 

बीड येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागात कार्यरत असलेले अधिकारी सचिन जाधवर यांचा 16 जानेवारी रोजी झालेला मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मृत्यूनंतर सात दिवस उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याने संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी थेट बीड ग्रामीण पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. अखेर या आंदोलनानंतर जाधवर यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मृतदेह स्वतःच्या कारमध्ये

 

सचिन जाधवर यांचा मृतदेह  त्यांच्या स्वतःच्या कारमध्ये आढळून आला होता. घटनास्थळी सापडलेल्या एका चिठ्ठीमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. या चिठ्ठीत प्रदीप फाटे यांचे नाव नमूद करत, मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या नोटमध्ये फाटे हे ठराविक फर्मच्या फाईल्स आधी करून देण्यासाठी सतत दबाव टाकत असल्याचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. याच मानसिक त्रासाला कंटाळून आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे जाधवर यांनी नमूद केल्याचा दावा कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.मृत्यू झाल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल न करता पोलिसांकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. पतीच्या मृत्यूला न्याय मिळावा यासाठी सचिन जाधवर यांच्या पत्नीने कोवळ्या लेकीसह पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. “माझे पती कधीही आत्महत्या करू शकत नाहीत. त्यांच्यावर अन्याय झाला आहे,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. नातेवाइकांनीही या मृत्यूमागे कट असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली.

 

अखेर आंदोलनाची दखल घेत पोलिस प्रशासनाने जाधवर यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून प्रदीप फाटे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, सचिन जाधवर यांनी आत्महत्या नेमकी कशी केली, मृत्यूच्या वेळी घटनास्थळी कोण होते आणि कारमध्ये मृतदेह आढळण्यामागील परिस्थिती काय होती, याबाबत अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या सर्व बाबी संशयास्पद असून त्याचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

वस्तू व सेवा कर विभागातील एका अधिकाऱ्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणातून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कुटुंबीयांनी न्यायाची मागणी लावून धरली असून, या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles