-10.2 C
New York
Sunday, January 25, 2026

Buy now

spot_img

पत्नीचा खून करून हृदयविकाराचा बनाव; पोलिसांच्या सतर्कतेमुळे पती जेरबंद

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अंबाजोगाई  |

 

अंबाजोगाई तालुक्यातील हातोला शिवारात एका पतीने पत्नीच्या डोक्यात काठीने वार करून तिचा निर्घृण खून केला. हा खून पचवण्यासाठी पतीने पत्नीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचला आणि मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावीही नेला. मात्र, बर्दापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा थरारक बनाव उघड झाला असून, अंत्यसंस्कारापूर्वीच आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

​शीलाबाई सुरेश शेरफुले (वय ४५, रा. आलुरा, ता. देगलूर) असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी पती सुरेश शेरफुले हा हातोला येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून पत्नीसह वास्तव्यास होता. गेल्या ३-४ दिवसांपासून सुरेश पत्नीकडे गावी जाण्याचा हट्ट धरत होता, मात्र शीलाबाई तयार नव्हत्या. याच कारणावरून शुक्रवारी (दि. २३ जानेवारी) दोघांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात सुरेशने जाड काठीने शीलाबाईच्या डोक्यात वर्मी घाव घातले, ज्यात रक्ताच्या थारोळ्यात कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

असा रचला बनाव

​खून केल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी सुरेशने नातेवाईकांना आणि परिसरातील लोकांना “पत्नीचा मृत्यू हृदयविकाराने झाला” असे खोटे सांगितले. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने तातडीने एक क्रुझर गाडी भाड्याने केली आणि मृतदेह घेऊन थेट मूळ गावी (आलुरा, जि. नांदेड) गाठले.

पोलिसांची तत्परता आणि कारवाई

​घटनेची कुणकुण लागताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी तातडीने चक्रे फिरवली. त्यांनी देगलूर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी यांनी तातडीने आलुरा गाव गाठले.

​संशय बळावला: मृतदेहाच्या डोक्यावरील जखमा पाहून माहेरच्या लोकांनाही संशय आला होता. पोलिसांनी अंत्यसंस्काराच्या तयारीपूर्वीच मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपी सुरेशला अटक केली.

​”सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयात पाठवण्यात आला असून, आरोपी पती बर्दापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.”

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles