0.3 C
New York
Thursday, January 1, 2026

Buy now

spot_img

बीड पोलिसांचा दणका: हातभट्टीचा चोरटा व्यापार करणाऱ्या गुंडाला ‘एमपीडीए’अंतर्गत हर्सुल कारागृहात धाडले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

माजलगाव |

बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुंडगिरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. हातभट्टीची दारू तयार करून तिचा चोरटा व्यापार करणाऱ्या माजलगाव येथील एका सराईत गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून, त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

माजलगाव शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी भगवान कटाळू मेंडके (वय ५२ वर्षे) हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होता. या इसमावर हातभट्टीची दारू तयार करणे, ती बाळगणे, चोरटी विक्री आणि वाहतूक करणे अशा स्वरूपाचे तब्बल १० गंभीर गुन्हे नोंद आहेत. यापैकी ८ गुन्हे न्यायप्रविष्ट असून २ गुन्हे पोलीस तपासावर आहेत.
वारंवार प्रतिबंधक कारवाई करूनही मेंडके याच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्याच्या या अवैध व्यवसायामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता.

 

बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सार्वजनिक सुव्यवस्था आणि जनहित लक्षात घेऊन ३१ डिसेंबर २०२५ रोजी या प्रकरणावर शिक्कामोर्तब केले. एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत आदेश पारित होताच, पोलीस अधीक्षक काँवत यांनी तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार ३१ डिसेंबरच्या रात्री २१:३५ वाजेच्या सुमारास पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर आज, १ जानेवारी २०२६ रोजी त्याला कडक पोलीस बंदोबस्तात हर्सुल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

ही महत्त्वाची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक (अंबाजोगाई) श्रीमती चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी (माजलगाव) श्शैलेश गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. राहुल सूर्यतळ, सपोनि प्रल्हाद मुंडे, पोउपनि माखने आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा समावेश होता.

पोलीस अधीक्षकांचा इशारा

“बीड जिल्ह्यात वाळू माफिया, अवैध गुटखा विक्रेते, जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे, जातीय तेढ निर्माण करणारे समाजकंटक आणि खंडणीबहाद्दर गुंडांची गय केली जाणार नाही. भविष्यात अशा घटकांवर एम.पी.डी.ए. अंतर्गत अधिक कठोर कारवाई करण्यात येईल.”
— नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक, बीड.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles