राज्यभरात बिबट्यांच्या हल्ल्यांत वाढ झाली आहे. त्यात होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईत वाढ करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. राज्यात बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत ५३ व्यक्तींचा मृत्यू, तर १४५ जण गंभीर जखमी झाले.
२६ हजार ९७९ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. त्या बदल्यात आत्तापर्यंत भरपाईपोटी २६ कोटी ७२ लाख ५६ हजार रुपये इतकी नुकसान भरपाई दिली आहे. यापुढेही त्यासाठी विशेष तरतुदीसाठी हालचाली सुरू आहेत. पुणे, सातारा जिल्ह्यातही विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.
संघर्ष टाळण्यासाठी उपाय
वन विभागाच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर, सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, कऱ्हाड यांसारख्या तालुक्याच्या ठिकाणी बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हा संघर्ष लक्षात घेऊन उपाययोजना करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी वन विभागास सूचना दिल्या आहेत. त्याची आढावा बैठकही शासनस्तरावर घेऊन पाठपुरावा केला जाणार आहे.
सौरऊर्जा कुंपणाची सोय
पश्चिम महाराष्ट्रात जेथे बिबट व मानवी संघर्ष आहे. तेथे तो टाळण्यासाठी सौरऊर्जा कुंपण, दिवे, वाहने, टॉर्च, एआय यंत्रणेसारख्या सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचीही तरतूद केली जाणार आहे. त्याशिवाय स्पेशल लेपर्ड फोर्स स्थापन करण्याबाबतही सर्वव्यापी निर्णय घेण्यात येणार आहे. बिबट प्राणी अनुसूचीमध्ये (१) असून, तो अनुसूची (२) मध्ये आणण्यासाठी केंद्रीय कायद्यात दुरुस्ती करण्याची केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.
संघर्ष टाळण्यासाठी उपाय
वन विभागाच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर, सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, कऱ्हाड यांसारख्या तालुक्याच्या ठिकाणी बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष वाढला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील हा संघर्ष लक्षात घेऊन उपाययोजना करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी वन विभागास सूचना दिल्या आहेत. त्याची आढावा बैठकही शासनस्तरावर घेऊन पाठपुरावा केला जाणार आहे.


