-1.9 C
New York
Friday, January 10, 2025

Buy now

spot_img

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा,देवेंद्र फडणवीसांचे सीआयडी महासंचालकांना आदेश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता पोलिस आणि सीआयडीकडून तपासाची सूत्रे वेगाने फिरवली जात आहे. देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला.आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत. त्यांची संपत्ती जप्त करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना दिले आहेत.

बीड हत्या प्रकरणात 20 दिवस उलटले आहेत. हत्या प्रकरणातील सातपैकी चार आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपी अद्याप आरोपी आहे. या फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करा. तसेच धनजंय मुंडे यांना हाकला आणि वाल्मिकी कराडला अटक करा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी मोठा निर्णय घेतला आहे. बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना देण्यात आले आहे. त्याबरोबरच बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा,असे आदेश बीड पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहे आणि तातडीने फेरआढावा घ्या, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा

जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याप्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला . मूक मोर्चाला संभाजीराजे छत्रपती, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके, अभिमन्यू पवार, नरेंद्र पाटील, ज्योती मेटकर आणि दीपक केदार यांनी संबोधित केले. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने सुद्धा मोर्चाला संबोधित केले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles