नवी दिल्ली |
बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूमागे दिल्लीतील उद्योगपती विकास मालू यांच्या पत्नी सानवी मालू यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.तसेच सतीश कौशिक यांच्या मृत्यूबाबत आणखीनच गुढवलय निर्माण झाले आहे. सानवी यांनी आपले पती विकास मालू यांच्यावरच थेट आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सतिश कौशिक यांच्या मृत्यूसंदर्भात आपल्या पतीवर आरोप करत सानवी यांनी म्हटले आहे की, तिच्या पतीचे कौशिक यांच्याकडे १५ कोटी रूपयांचे कर्ज होते. या कर्जाच्या पैशाची सतिश कौशिक यांच्याकडून वारंवार मागणी होत होती. त्यामुळे तिचे पती विकास मालू यांना सतिश कौशिक यांच्यापासून सुटका हवी होती. मृत्युपूर्वी सतिश कौशिक यांनी ज्या फार्महाऊसवर पार्टी केली होती, त्या फार्महाऊसचा मालक हे उद्योगपती विकास मालू हे होते. सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी निधन झाले होते. त्याच्या एक दिवस आधी सतिश कौशिक यांनी होळी पार्टी केली होती, त्याचे काही फोटो देखील कौशिक यांनी सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते.
त्यानंतर सतीश कौशिक यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालानंतर हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले होते, अशी माहिती देण्यात आली होती.
उद्योगपती विकास मालू यांच्या पत्नी सानवी यांनी केलेल्या खुलाशाप्रकरणी त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. यानंतर सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिस अधिक तपास करत असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.