-1.3 C
New York
Friday, January 10, 2025

Buy now

spot_img

टपाली मतदान केल्यानंतर ‘चमकोगिरी’ भोवली; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलीस शिपायावर गुन्हा दाखल झाला आहे. गणेश अशोक शिंदे यांनी 231-आष्टी विधानसभा मतदार संघ, जिल्हा बीड या मतदार संघासाठी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान केलं होते. मत नोंदवल्यानंतर नोंदवल्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये मतपत्रिकेचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे कायदेशीर आदेशाची अवज्ञा केली. तसेच मतदानाची गोपनियता भंग केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती 185 मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली.

 

 

 

मलबार हिल मतदारसंघात विल्सन महाविद्यालय, नेताजी सुभाषचंद्र रोड, गिरगाव चौपाटी, चर्नीरोड मुंबई येथे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदानासाठी फॅसिलिटेशन सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटरमधील मतदान केंद्र क्रमांक 3 वर सदर घटना घडली आहे.

 

 

 

सर्व मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल वापरण्यास पूर्णपणे बंदी असल्याबाबत तसेच मतदारांनी त्यांचे मतदान करीत असताना पुर्णतः गोपनियता बाळगून, मतदान करावे व मतदान पुर्ण केल्यानंतर, बॅलेट मतपत्रिका व 13 ए फॉर्म हा त्यासोबत असलेल्या लिफाफ्यात भरुन सदरचा लिफाफा बंद अवस्थेत केवळ मतदान कक्षात ठेवलेल्या मतदान पेटीत टाकण्याबाबत सुचित केले होते. अशी माहिती मतदान केंद्राध्यक्ष प्रसन्न मधुसुदन तांबे यांनी दिली.

 

पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे यांनी मतपत्रिकेची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles