पुण्यामधील पूजा खेडकर प्रकरण सध्या सर्वत्र गाजत आहे. यानंतर आता मुंबई पोलिसांनी मंत्रालय परिसरातील अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरील दिवे काढण्यास सुरुवात केली आहे. गाडीवरील दिवे काढून त्या संबधित आधिकाऱ्यांना नोटीस देखील बजावण्यात येणार आहे.गाडीवर दिवा लावण्याची परवांनगी नसेल, आणि तरीही गाडीवर दिवा असेल तर त्या आधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
तर मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या आणि बाहेरुन येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर असणाऱ्या दिव्यांची पाहणी करण्यासाठी मुंबई पोलिसांच विशेष पथक आहे. गाडीवर दिवा लावण्याची परवांगी नसल्यास अधिकाऱ्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. तर जिल्हाअधिकारी आणि सचिव यांच्या देखील गाड्यांवरचे दिवे काढायला सुरुवात झाली आहे.
मात्र काही अधिकाऱ्यांना गाड्यांवर दिवे लावण्याची परवांगी आहे. परंतु मंत्रालयातील गाड्यांवर दिवे आणि’महाराष्ट्र शासन’ लिहिले आहे, ते दिवे मात्र काढायला सुरुवाच झाली आहे. दरम्यान पुण्यामधील पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी पदाच्या प्रशिक्षण काळातचं गाडीवर दिवा लावल्याने त्या सर्वांच्या नजरेत आल्या होत्या.