5 C
New York
Sunday, January 12, 2025

Buy now

spot_img

कोर्टाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला कोर्टाने मोठा दणका दिला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलाय. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी तिला अटक होण्याची शक्यता आहे.

बनावट प्रमाणपत्राद्वारे आरक्षणाचा लाभ घेणे, खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणे तसेच खासगी वाहनावर लाल अंबर दिवा लावणे, असे विविध आरोप पूजा खेडकरवर आहेत. कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे पूजा खेडकरच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

 

 

याप्रकरणी यूपीएससीनं तक्रार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी विविध कलमांअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात पूजाला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पोलिसांनी ३ वेळा समन्स देखील बजावले होते. पण पूजा खेडकर चौकशीसाठी हजर राहिली नाही. पूजा खेडकरचा फोन नॉट रिचेबल येत आहे. या प्रकरणात अटक होऊ नये म्हणून पूजा खेडकरने थेट कोर्टाची पायरी चढली होती. पण आता कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता पूजा खेडकरला कधीही अटक होऊ शकते.

 

पूजा खेडकर प्रकरणात यूपीएससीने बुधवारी सर्वात मोठी कारवाई केली होती. यूपीएससीने पूजा खेडकरचे आयएएस पद रद्द केले होते. यूपीएससीने प्रेस नोट जाहीर करत पूजा खेडकरचे आयएएस पद रद्द केले. यामध्ये पूजा खेडकरला २०२२ साली आम्ही दिलेले आयएएस पद तात्पुरतं रद्द करत आहोत असे यूपीएससीने लिहिले होते. यूपीएससीने पूजा खेडकरचे आयएएस पद रद्द केल्यामुळे आता तिला भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडींमधून कायमचे काढून टाकण्याचे निर्देश यूपीएससीने दिले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पूजा खेडकरला दोषी ठरवण्यात आले आहे.

 

दरम्यान, पूजा खेडकरने आयएएस अधिकारी बनण्यासाठी यूपीएससीची मोठी फसवणूक केली आहे. बनावट प्रमाणपत्राद्वारे आरक्षणाचा लाभ घेणे, खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणे तसेच खासगी वाहनावर लाल अंबर दिवा लावणे, असे अनेक आरोप पूजा खेडकरवर आहेत. पूजा खेडकरने यूपीएससीची फसवणूक केली आहे. याप्रकरणी यूपीएससीने दिल्ली पोलिसात तिच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पूजाने पटियाला हाऊस कोर्टात अर्ज दाखल केला होता. पण आज सुनावणीदरम्यान कोर्टाने तिचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता पूजा खेडकरला अटक होणार हे निश्चित झाले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles