13.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

आयएएस पूजा खेडकर यांच्यावर युपीएससीकडून गुन्हा दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आयएएस पूजा खेडकर यांनी युपीएससी परिक्षेसाठी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी युपीएससीकडून गुन्हा दाखल करण्यात आलायं. पूजा खेडकर यांना केडर का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस युपीएससीकडून बजावण्यात आली आहे.खोटं अपंग प्रमाणपत्र सादर करुन युपीएसएसी परिक्षेतून अधिकारी झाल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर ठेवण्यात आला.

तसेच उमेदवारी का रद्द करू नये? यासंदर्भात त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. यापुढे कोणतीही परीक्षा देण्यास पूजा खेडकर यांच्यावर युपीएससीकडून (UPSC) बंदी घालण्यात आली आहे.

युपीएससीनं पूजा खेडकर प्रकरणात सखोल तपास केला आहे, तपासाअंती युपीएससीनं जे निष्कर्ष काढले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत.

  • पूजा खेडकर यांनी जास्त वेळा परीक्षा दिल्या आहेत.
  • युपीएससी परीक्षा नियम डावलून परीक्षा दिली
  • पूजा खेडकर यांनी अनेकवेळा परीक्षा दिली. जे की युपीएससीच्या नियमात बसत नाही
  • ओळखपत्र बदलून आणि आई वडीलांचे आणि स्वतःचे नाव बदलून परीक्षा दिल्या
  • ई मेल आयडी, पत्ता, मोबाईल नंबर आणि सही सुद्धा बदलली.

त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी दिवसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर आता दिवसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘पुजा खेडकर यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांसंदर्भात मला अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही, माझ्यापर्यंत तक्रार आल्यानंतर योग्यवेळी योग्य ठिकाणी माझी बाजू मांडेन असं दिवसे यांनी म्हटलं आहे.

पूजा खेडकर प्रकरणात विभागीय आयुक्तांचा चौकशी अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खेडकर यांच्याविरोधात पाठवलेल्या अहवालानंतर पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी दिवसे यांच्यावर आरोप केले होते. अपमानास्पद वागणूक दिल्याचा आणि अहवाल व्हायरल करून प्रतिमा मलिन केल्याचा आरोप पूजा खेडकर यांनी केला होता. त्यानंतर दोन्ही बाजुंची शहानिशा करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना देण्यात आले होते. त्यानुसार चौकशी करून विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles