19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

‘एका रात्रीत निवडून दिलं तसं एका रात्रीत पार्सल बीडला पाठवणार’ राम सातपुतेंना मोहिते पाटलांचा थेट इशारा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अकलुज |

माळशिरसमधून ज्यांना आमदार केलं, ‘एका रात्रीत निवडून दिलं तसं एका रात्रीत पार्सल बीडला पाठवणार’असं चॅलेंज धैर्यशील मोहितेंनी राम सातपुतेंना दिलं.

पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण वळवण्याची ताकद असलेला माढा लोकसभा मतदारसंघ आता राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात असलेली काँग्रेसमधील दुसरी फळी पुन्हा आपल्याकडे वळून घेण्याचे प्रयत्न शरद पवार यांच्याकडून केला जातोय. अशातच पश्मिच महाराष्ट्रातील केंद्रस्थान असलेल्या माढ्यात आता मोहिते पाटील कुटूंबियांना शरद पवारांनी हाताशी धरलंय. वाढत्या असंतोषाचा फायदा घेत शरद पवारांनी चालाख खेळी केली अन् माढ्याचं राजकीय समीकरण फिरवलं.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला नारळ दिला अन् राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी बोलताना मोहिते पाटलांनी थेट राम सातपुते यांना तंबी दिली आहे. तुला एका रात्रीत आमदार केला. एका रात्रीत तुझं पार्सल माघारी बीडला पाठवायची ताकत आहे, असा थेट इशारा मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना दिल्याने आता माढ्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले धैर्यशील मोहिते पाटील?

मला फक्त आज इथं एका माणसाला उत्तर द्यायचं आहे. आपण त्याला इथून निवडून दिलं. त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला. मांडव्यात म्हटला, 70 -75 वर्षात काय विकास केला? त्यांनी जे काम केलं, ते मी अडीच वर्षात केलं. मी फक्त एकच उत्तर देतो. दादांच्या सांगण्यावरून एका रात्रीत तुला आमदार केला. तुला एकच सांगतो. एका रात्रीत तुझं पार्सल माघारी बीडला पाठवायची ताकद आमच्यात हाय, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांना थेट इशारा दिला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदमध्ये आपण सत्ता आणून दिली. कायदेशीर कारवाईला समोर गेलो. खासदार निधी काय असतो हे विजयसिंह खासदार असताना त्यांनी दाखवून दिलं. आज दोन्ही पालखी मार्ग, सातारा पंढरपूर, पंढरपूर लातूर मार्ग विजयसिंह मोहिते खासदार असताना सुरुवात झाली. लाख मते ज्यांना आम्ही दिले, त्यांनी आम्हाला कोणत्याही बैठकीला बोलवले नाही. विरोधी आमदार घेऊन नीरा देवघर कालवा बैठकीला घेऊन गेले, अशी टीका धैर्यशील मोहिते पाटलांनी केली आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles