-8.6 C
New York
Wednesday, January 28, 2026

Buy now

spot_img

तर तुमचा मोबाईल नंबर दुसऱ्याला ट्रान्सफर होणार?…व्हॉट्सॲप यूजर्सला सुप्रीम कोर्टाचा कोर्टाचा इशारा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

व्हॉट्सॲप प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने Jio, Airtel आणि Vodafone Idea ला मोबाईल नंबर ट्रान्सफर करण्याची परवानगी दिली आहे. याचा अर्थ, जर तुम्ही तुमचा मोबाईल बराच काळ रिचार्ज केला नाही तर दूरसंचार कंपन्यांना तुमचा नंबर दुसऱ्याला देण्याचे स्वातंत्र्य मिळेल.असे झाल्यास व्हॉट्सॲप यूजर्सना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कारण सध्या अनेक लोक व्हॉट्सॲप आणि कॉलिंगसाठी वेगवेगळे मोबाइल नंबर वापरतात. अशा सर्व व्हॉट्सॲप यूजर्सना मोठा फटका बसणार आहे.

 

काय प्रकरण होते

 

या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वास्तविक, अधिवक्ता राजेश्वरी यांनी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने निष्क्रिय मोबाइल क्रमांक इतरांना देऊ नयेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने तिची मागणी फेटाळली आहे. दूरसंचार कंपन्या बंद झालेला मोबाईल नंबर दुसऱ्याला देऊ शकतात, असे कोर्टाने म्हटले आहे.

 

व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईल नंबर आणि डेटाचा गैरवापर होऊ नये असे वाटत असेल तर त्याची जबाबदारी वापरकर्त्यांना घ्यावी लागेल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला. वापरकर्त्यांनी स्वतःच त्यांचा डेटा वेळेत हटवावा. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, वापरकर्त्यांनी त्यांच्या डेटाचा गैरवापर टाळण्यासाठी त्यांच्या गोपनीयतेकडे लक्ष दिले पाहिजे.

 

नियम काय म्हणतो

 

दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार, मोबाइल रिचार्ज न झाल्यामुळे मोबाइल क्रमांक निष्क्रिय झाला असेल, तर तो किमान 90 दिवस दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये. मात्र, दूरसंचार कंपन्यांनी मोबाइल क्रमांक लगेच दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles