21.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

मराठा आरक्षणासाठी नायगावला तरुणाची आत्महत्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मागणीत कायम अग्रेसर असणाऱ्या तरुणाने आरक्षणासाठी आयोजित चक्काजाम आंदोलनाच्या धामधुमीवेळीच गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना नायगाव (ता. पाटोदा) येथे घडली.

गोविंद गोपीचंद औटे (वय – ४२) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, गोविंद औटे यांनी मराठा आरक्षण मागणीसाठीच आत्महत्या केल्याचा जबाब नातेवाईकांनी पोलिसांना दिला.

 

मराठा आरक्षण मागणी आंदोलनात गोविंद औटे कायम अ्रगेसर असत. दरम्यान, गुरुवारी याच मागणीसाठी जिल्हाभरात सकाळी १० ते १२ या काळात चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली होती. नायगावला देखील आंदोलनाच्या तयारीत गोविंद औटे सहभागी होते.मात्र, इतर आंदोलक आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेल्यानंतर गोविंद औटे यांनी शेतात जाऊन गळफास घेतला. गोविंद औटे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईक व मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला.

 

जोपर्यंत त्यांच्या नातेवाईकाला शासकीय नोकरी व दहा लाख रुपयांची मदत देण्याचे लेखी आश्‍वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला. यानंतर पाटोदाचे उपविभागीय अधिकारी श्री. कुदळे यांनी आंदोलकांना त्यांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना कळविल्याचे पत्र दिले.तसेच, मागणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला. नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात देखील मराठा आरक्षणासाठीच आत्महत्या केल्याचे सांगीतले असल्याची माहिती, पाटोदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनिष पाटील यांनी सांगीतले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles