21.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

रामकृष्ण बांगर यांच्या वाढदिवसाच्या ऐतिहासिक अभिष्टचिंतन सोहळ्याची उत्सुकता शिगेला!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पाटोदा |

 

शिक्षण व सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांच्या वाढदिवसानिमित्त पाटोदा येथे होणारा अभिष्टचिंतन सोहळा तालुक्यात ऐतिहासिक ठरणार असून हा सोहळा शनिवार दिनांक 27 मे 2023 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न होणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो जणांना उत्कंठा लागली आहे.

 

या अभिष्टचिंतन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय आमदार धनंजय जी मुंडे साहेब असणारे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब आजबे, आमदार सुरेश आण्णा धस माजी आमदार भीमराव धोंडे साहेब माजी आमदार साहेबराव दरेकर नाना, युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख, परळी नगर परिषदेच्या घटनेचे वाल्मीक आण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, पाटोदा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, राष्ट्रीय काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष जुबेर चाऊस यांची उपस्थिती राहणार आहे.

 

या अभिष्टचिंतन सोहळ्यात मंचावर इन्फंट इंडिया पालीचे दत्ताभाऊ बारगजे आणि शांतीवन आर्वीचे दीपक राव नागरगोजे यांचा उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल सन्मान करण्यात येणार आहे.

 

तसेच कोविड काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार आहे यामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एल.आर. तांदळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सावंत डॉक्टर प्रगती बिनवडे, डॉक्टर चैताली भोंडवे, डॉक्टर प्रताप जाधव, डॉक्टर मयूर शिंदे, डॉक्टर रवींद्र गोरे, डॉक्टर इमरान शेख, डॉक्टर दत्ता बांगर, डॉक्टर सचिन जायभाय, डॉक्टर रवींद्र राजपुरे यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

 

शिक्षण व सहकार महर्षी ऋषी तुल्य व्यक्तिमत्व रामकृष्ण बांगर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी राजकीय मान्यवरांसह सिनेसृष्टीतील आघाडीच्या नायिका मानसी नाईक, अभिलिप्सा पांडे, रूपाली भोसले, स्मिता गोंदकर, दर्शन साटम, कविता राम तसेच सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मारतोंडकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

 

पाटोद्याच्या इतिहासातील हा ऐतिहासिक देखना अभिष्टचिंतन सोहळा पाटोदा येथिल चाऊस मैदान मांजरसुंबा रोड पाटोदा येथे शनिवारी संपन्न होणार आहे. ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपणास लाभेल यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक विजयसिंह बाळा बांगर यांनी केले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles