18.9 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

विवाहितेला नांदवण्यास प्राध्यापक पतीचा नकार; पत्नीचा गंभीर आरोप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

हुंड्यापोटी ठरलेल्या 5 लाखांपैकी 3 लाख रुपये दिले नाही म्हणून विवाहितेला नांदवण्यास प्राध्यापक पतीने नकार दिलाय. तसेच अगोदर पैसे घेऊन ये मगच तुला नांदवू, असा पवित्रा घेत तिचा छळ करून मारहाण करण्यात आली. यामुळे लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांत संसाराचा खेळखंडोबा झाला आणि संसार तुटला. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यात प्राध्यापक पतीसह सासरच्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.

विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून, गेवराई (Beed) तालुक्यातील एका तरुणीचा विवाह धाराशिव शहरातील एका तरुणासोबत 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाला होता. हुंडा म्हणून 5 लाख रुपयांपैकी 2 लाख रूपयेही दिले. तसेच सर्व मानपान थाटात लग्न करून दिले. परंतु अवघ्या हळद फिटण्याआधीच तिचा राहिलेल्या 3 लाख रुपयांसाठी छळ सुरू झाला. पती हा प्राध्यापक असल्याने प्रैक्टिकल, परीक्षा अशी कारणे सांगून रात्री उशिरा घरी येत असे. याबाबत विचारल्यास त्याने भांडणे केली.

विशेष म्हणजे त्याने शरीर सुखही दिले नाही. याबाबत विचारल्यावर अगोदर हुंड्याचे राहिलेले तीन लाख रूपये घेऊन ये तरच मी तुला सुख देईल, असे त्याने सांगितले. तसेच नशा करून तो विवाहितेस मारहाण करत असे. हा प्रकार कोणाला सांगू नये, याची भीती दाखविण्यासाठी बेडरूममध्ये गुप्ती, कुऱ्हाड असे धारदार शस्त्र ठेवले होते. हेच शस्त्र दाखवून प्राध्यापक पती हा विवाहितेला जीवे मारण्याच्या धमक्या देत होता.

हा सर्व प्रकार विवाहितेने सासरच्या लोकांना सांगितला, परंतु त्यांनीही तिचा छळ करून मारहाण केली. त्यानंतर विवाहितेने आईसह नातेवाइकांना व्यथा सांगितली. 24 एप्रिल 2023 रोजी विवाहितेला घराबाहेर हाकलण्यात आले. त्यानंतर विवाहितेने चकलांबा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी विवाहीतेच्या फिर्यादीवरुन प्राध्यापक पतीसह सासरा, सासू, दोन नणंदा, दीर, चुलत नणंद, नंदावा अशा 7 लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विवाहितेला घरात काही कागदपत्रे आढळली. यात तिच्या पतीला मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार सुरु असल्याचे समजले. तसेच तो नपुंसक असून सासरच्यांनी माझा विवाह अशा मुलासोबत लावून देत फसवणूक केल्याचा आरोपही विवाहितेने फिर्यादीतून केला आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles