2.8 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img

आष्टी तालुक्यात आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आष्टी |

कांद्याला मिळत असणाऱ्या कवडीमोल भावाने पुन्हा एका कांदा उत्पादक शेतकऱ्याचा बळी घेतलाय. कांद्याला भाव नाही, मग पैसे येणार कसे? पतसंस्थेचे घेतलेले कर्ज फेडणार कसे?आता जगायचं कसं?  या विवंचनेत असलेल्या 42 वर्षीय शेतकऱ्याने, गळफास घेऊन आत्महत्या केली. आष्टी तालुक्यातील अंभोरा येथे ही घटना घडली आहे. कांतीलाल नारायण गवळी असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.

शेतकरी कांतीलाल गवळी यांनी आपल्या दोन एकर शेतात कांदा लागवड केली होती. यासाठी त्यांना मोठा खर्चही आला. आता चांगला भाव लागला तर आपल्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल, असं त्यांना वाटत होतं.मात्र कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे आपण घेतलेले कर्ज कसं फेडावं? या विवंचनेतून शेतकरी कांतीलाल गवळी यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

दरम्यान यामुळे पुन्हा एकदा शेतमालाला भाव नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये असलेल्या नैराश्येचं वास्तव समोर आलं आहे. यामुळे मायबाप सरकारने शेतमालाच्या हमीभावावर तोडगा काढावा. शेतकऱ्यांना मानाने जगता येईल तेवढा तरी शेतमालाला भाव द्यावा. तरचं शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles