4.6 C
New York
Sunday, January 12, 2025

Buy now

spot_img

सावकारानं पैशाच्या वसुलीसाठी शेतकऱ्याला भररस्त्यात मारहाण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

सावकारानं पैशाच्या वसुलीसाठी तरुण शेतकऱ्याला घरून उचलून आणत भररस्त्यात जबर मारहाण केली. शेतकऱ्याला लोखंडी रॉड आणि फायटनं मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत हा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. जखमी शेतकऱ्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यावेळी वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला देखील धमकावण्यात आलं आहे. आम्ही याला मारून टाकू, कोणी मध्ये येऊ नका आमचं कोणी काही करू शकत नाही. असं म्हणत या शेतकऱ्याला पुन्हा सिमेंटच्या रस्त्यावर आपटण्यात आलं. आपली व्याथा सांगताना शेतकऱ्याला आश्रू अनावर झाले.

रोहित विश्वनाथ भडके वय 30 वर्ष असं मारहाण झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. दहा टक्के व्याजाने पैसे शेतकरी रोहित भडके यांनी त्यांच्या ओळखीच्या बाळू काटकर या सावकाराकडून 30 हजार रुपये व्याजाने घेतले होते. सुरुवातीला रोहित भडके यांना पाच रुपये टक्क्याने हे पैसे देण्यात आले होते. मात्र महिनाभरातच पैशाच्या व्याजाचा दर दुप्पट करण्यात आला.

तीस हजार रुपयांच्या बदल्यात भडके दर महिन्याला सावकाला तीन हजार रुपये द्यायचे. मात्र गेल्या तीन चार महिन्यांमध्ये त्यांना पैसे देणं शक्य झालं नाही.

पैसे थकल्यानं सावकाराच्या जाचाला कंटाळून रोहित भडके हे घर सोडून निघून गेले होते. मात्र ते घरी आल्यानंतर काल सकाळी सावकार बाळू काटकरसह अन्य 4 जणांनी शेतकरी रोहित भडके यांना गोड बोलून घरून उचलून आणलं. त्यानंतर त्यांना जबर मारहाण करण्या आली. आता केस माघारी घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप भडके यांनी केला आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles