-8 C
New York
Saturday, January 24, 2026

Buy now

spot_img

३३ किलो गांजा जप्त, एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे सापळा रचून एका इसमाला तब्बल ३३ किलो गांजासह रंगेहाथ पकडले. या कारवाईत गांजा आणि दुचाकीसह एकूण ७ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक इसम बजाज मोटार सायकलवरून गांजा विक्रीसाठी पात्रुड (ता. माजलगाव) येथे येत आहे. या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्या पथकाने पात्रुड परिसरात सापळा लावला. संशयित दुचाकी येताच पोलिसांनी तिला अडवून चालकाची झडती घेतली. त्याच्याकडे असलेल्या सॅकची पाहणी केली असता, त्यात सुमारे ३३ किलो गांजा मिळून आला.

 

पकडलेल्या आरोपीचे नाव सय्यद अत्तार रहेमान सय्यद नौमान (वय ३५ वर्षे, रा. परळी, जि. बीड) असे आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ७ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७/२०२६ नुसार कलम ८(क) आणि २०(ब) NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. राहुल सूर्यतळ करत आहेत.

 

ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड आणि पोलीस निरीक्षक श्री. राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पीएसआय सुशांत सुतळे, हवालदार मारोती कांबळे, सुनील अलगट, रामचंद्र केकान, गोविंद भताने, सचिन आंधळे, बिभीषण चव्हाण आणि चालक अतुल हराळे यांचा समावेश होता.

 

अमली पदार्थ विरोधी विशेष कक्षाचे आवाहन

 

बीड जिल्हा पोलीस दलातर्फे अमली पदार्थांविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्वतंत्र NDPS कक्ष (अमली पदार्थ विरोधी कक्ष) स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोठेही अमली पदार्थांची लागवड, साठवणूक, खरेदी-विक्री किंवा वाहतूक होत असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा. हेल्पलाईन क्रमांक: ९२७०२४३२०० > (माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.)

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles