श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथी सोहळ्याला हजेरी लावणार
पाटोदा | प्रतिनिधी
श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण पुण्यतिथी सोहळ्याचे भव्य व ऐतिहासिक आयोजन श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे करण्यात आले असून, या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस देवेंद्र फडवणीस हे दि.10 जानेवारी रोजी शनिवारी उपस्थित राहणार आहेत.
संत वामनभाऊ महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त ३ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत आठ दिवस चालणारा भव्य धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला असून, या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गहिनीनाथगड परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार असून, महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही लाखो भाविक हजेरी लावतात.
या सुवर्ण महोत्सवातील विशेष आकर्षण म्हणजे १० जानेवारी २०२६ रोजी मंदिराच्या शिखरावर शुद्ध सोन्याचा कळस बसविण्याचा भव्य धार्मिक सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेहा सोहळा श्री संत वामनभाऊ महाराजांच्या भक्तांसाठी ऐतिहासिक व अविस्मरणीय ठरणार आहे.


