3.9 C
New York
Thursday, November 20, 2025

Buy now

spot_img

शालार्थ घोटाळ्यात शिक्षणाधिकारी निलंबित; एसआयटी चौकशीत ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न उघड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

 

संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढत असून या प्रकरणात बीड आणि लातूर या दोन जिल्ह्यांच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची कारवाई शालेय शिक्षण विभागाने केली.या प्रकरणी सुरू असलेल्या एसआयटी चौकशीतील काही अधिकाऱ्यांना ‘मॅनेज’ केल्याची या दोन अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लीप काही दिवसांपूर्वी बाहेर आली होती. त्याची दखल घेत शिक्षण विभागाने तातडीने ही कारवाई केली.

 

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि टीडीएफ या दोन संघटनांनी हे प्रकरण धसाला लावले. त्यासाठी बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय आणि माजी शिक्षक आमदार ना. गो. गाणार, आमदार संजय दटके यांनी प्रयत्न केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू झाली. याच दरम्यान बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी असलेल्या भगवान फुलारी आणि नागनाथ शिंदे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.

 

 

या क्लिपमध्ये हे दोन अधिकारी एसआयटी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना कशा प्रकारे ‘मॅनेज’ करायचे, याबाबत चर्चा करत असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, आणि एसआयटी अधिकारी यांना याबाबत माहिती दिली. शासनानेही या प्रकरणाची दखल घेत या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आणि त्यांना तात्काळ निलंबित केले. शालेय शिक्षण विभागाचा हा निर्णय स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया राज्य शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.

 

 

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई झाली आहे. बीड आणि लातूर जिल्ह्यांच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. एसआयटी चौकशीतील अधिकाऱ्यांना मॅनेज करण्याच्या ऑडिओ क्लिपमुळे हे निलंबन झाले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि टीडीएफने हे प्रकरण लावून धरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर एसआयटी चौकशी सुरू झाली होती.

 

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles