- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
बीड |
एकाच बॉयफ्रेंडवरून दोन मैत्रिणींमध्ये वाद सुरू झाला आणि. यातूनच होमगार्ड महिलेची हत्या करण्यात आली आहे. नंतर महिलेचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तपास करीत मैत्रिणीसह ४ जणांना ताब्यात घेतलंय. या प्रकरणानंतर बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
अयोध्या राहुल व्हरकडे (वय वर्ष २६) असे मृत महिलेचं नाव आहे. ती बीडच्या गेवराई येथील रहिवासी होती. चार वर्षांपूर्वी अयोध्याच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला होता. तिला ३ वर्षांची मुलगीही आहे. ती सध्या सासरी असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी तिची होमगार्डमध्ये भरती झाली होती. अयोध्या अंबिका चौक परिसरात पोलीस भरतीची तयारीही करीत होती.
अयोध्याची फडताडे नावाची मैत्रीण होती. तिचे राठोड नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांनंतर राठोडची अयोध्याशी जवळीक वाढली. यामुळे फडताडेला ही बाब सहन झाली नाही. तिच्या मनात अयोध्याविषयी प्रचंड राग होता. तिनं अयोध्येचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. तिने यासाठी काही साथीदारांची मदत घेऊन प्लॅन रचला.
दोन दिवसांपूर्वी तिनं अयोध्येला घरी बोलावून घेतलं. घरी त्यावेळेस कुणीच नव्हतं. तिनं इतरांच्या मदतीने अयोध्येचा गळा दाबला. तसेच खून केला. यानंतर मृतदेहाचा विल्हेवाट लावली. मध्यरात्री मृतदेह एका खोक्यात ठेवला. नंतर स्कूटी घेऊन अज्ञात जागेवर गेली. झाडीत असलेल्या नाल्यात तिनं अयोध्येचा मृतदेह फेकला. दरम्यान, अयोध्येचा मृतदेह तंरगत पाण्यावर आला. स्थानिकांनी गुरूवारी सकाळी मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. तपासात पोलिसांना प्रेम प्रकरणातून अयोध्येचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तपास करीत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.