4 C
New York
Friday, January 10, 2025

Buy now

spot_img

परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे, राजेसाहेब देशमुख आणि राजेभाऊ फड यांचा उमेदवारी अर्ज वैध

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

विधानसभा  निवडणुकी करता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज छाननी होत आहे. परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे, महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख आणि अपक्ष उमेदवार राजेभाऊ फड यांचा अर्ज वैध ठरला आहे.

 

महायुतीकडून धनंजय मुंडे, महाविकास आघाडी कडून राजेसाहेब देशमुख, तर शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे राजेभाऊ फड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या तिघांचाही अर्ज वैध ठरला आहे. दरम्यान परळी विधानसभा मतदारसंघातून करुणा शर्मा यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचा अर्ज बाद झाल्याने अवैध ठरविण्यात आला आहे.

 

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातून १७६ इच्छुक उमेदवारांनी २६६ उमेदवारी अर्ज दाखल केले. आतापर्यंत जिल्ह्यातून ४०९ इच्छुक उमेदवारांनी तब्बल ५६६ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बीड व माजलगाव मतदार संघातून सर्वाधिक १३८ उमदेवारी अर्ज दाखल झाले आहेत.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles