आष्टी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमातून माजी आमदार सुरेश धस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .दरम्यान दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात सादर करण्यात आलेल्या माहितीमध्ये सुरेश धस यांची संपत्ती सहा वर्षांमध्ये चार पटीने वाढली आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच निर्माण झाला होता. अखेर सोमवारी भाजपाने सुरेश धस यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर केली. धस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
धस यांच्या शपथ पत्रानुसार त्यांच्या दोन्ही पत्नींच्या व मुलींच्या नावे एकूण 36 कोटी 93 लाख 94 हजार 182 रुपये इतकी संपत्ती आहे. 2018 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील त्यांच्या शपथपत्रानुसार त्यांच्या पत्नीच्या आणि मुलांच्या नावे एकूण 9 कोटी 27 लाख 90 हजार 616 इतकी संपत्ती होती. ज्यात आता चार पटीने वाढ झाली आहे. सुरेश धस यांच्या स्वतःकडे एक कोटी 96 लाख 78 हजार 175 रुपयांची चल संपत्ती आहे. पत्नी संगीता यांच्या नावे 53 लाख 833 रुपये दुसऱ्या पत्नी प्राजक्ता यांच्या नावे आठ कोटी 89 लाख 97 हजार 649 रुपये इतकी संपत्ती आहे.